Peoples Media Pune header

Go Back

देवर्षि नारद जयंती निमित्त पत्रकार सन्मान समारोह संपन्न.

09 Jun 2019

पत्रकारितेतील आद्य पुरुष म्हणजे देवर्षि नारद यांच्या जयंती निमित्त  विश्व संवाद केंद्र,पुणे व भारतीय संस्कृति संवर्धक संस्था(रा.स्व.संघ)यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील विविध वृत्तपत्रे.व वाहिनी यांचे पत्रकार व छायाचित्रकार यांचा सन्मान करण्यात आला.मोतीबाग येथील केशव सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शरदरावजी कुंटे(अध्यक्ष डेक्कन एज्यु.सोसा.)अभयराव कुलकर्णी(विश्व संवाद केंद्र विश्वस्त),विकास दामले( संस्कृति संवर्धक संस्था कोषाध्यक्ष),प्रशांत यादव,महेशराव करपे(महानगर कार्यवाह)आदि मान्यवर व पत्रकार-छायाचित्रकार उपस्थित होते.गुलाब पुष्प व पुस्तक असे सत्काराचे स्वरूप होते.याप्रसंगी बोलताना शरदराव कुंटे यांनी पत्रकार व मध्यम यांनी चांगल्या बाबी व वाईट बाबी दोन्ही मांडाव्यात.मात्र चांगल्या बाबींना प्रोत्साहन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.अभयराव कुलकर्णी यांनी देवर्षि नारद हे आद्य पत्रकारच होते.त्यांच्या प्रमाणेच आपली माहिती सर्वांना समजेल त्यात अर्थही योग्य रीतीने असावा असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :सत्कारित मध्यम प्रतींनिधी व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite