Peoples Media Pune header

Go Back

१४ वा जैन ऊच्चशिक्षित वधूवर मेळावा संपन्न

05 Jun 2019

जैन वधूवर परिचय संस्थेच्या वतीने नुकताच १४ वा ऊच्चशिक्षित वधूवर मेळावा संपन्न झाला.हे १४ मेळावे व सर्वसाधारण मेळावे असे आजपर्यंत ४८ मेळावे संपन्न जाहले आहेत.महालक्ष्मी लॉन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी जैन वधूवर परिचय संस्थेचे अध्यक्ष विजय शहा,उपाध्यक्ष लताबेन शहा,प्रमुख पाहुणे संजीव शहा(साहसी क्रीडा प्रकार पटू)सेक्रेटरी रोहित झवेरी,खजिनदार योगेश शहा,राजीवभाई शहा आदि मान्यवरांच्या बरोबरच वर व वधू सुमारे २०० उपस्थित होते.तसेच त्यांचे पालकही उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना विजय शहा यांनी कितीही तंत्रज्ञान बदलले तरी लग्नासारख्या बाबीत प्रत्यक्ष भेटणे महत्वाचे असते व ते अशा मेळव्यांनी साध्य होते असे संगितले. राजीव शहा यांनी या मेळाव्यात एका पुस्तिकेत सर्व वधूवरांची माहिती दिली आहे.त्यामुळे योग्य वर वधू मिळवयास सहाय्य होईल असे नमूद केले॰

छायाचित्र :वर वधू आपला परिचय करून देताना 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite