Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने आर्किटेक्चर व डिझाईन मधील करिअर विषयावर मोफत मार्गदर्शन

05 Jun 2019

रोटरी क्लब बाणेरच्या वतीने आर्किटेक्चर व डिझाईन मधील करिअर या विषयावर मोफत मार्गदर्शक व्याख्यानचे आयोजन नुकतेच करण्यात आले.पंडित जवाहरलाल नेहरू संकृतिक हॉल,घोलेरोड यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब बाणेरचे अध्यक्ष शेखर शेठ,प्रमुख मार्गदर्शक जयश्री देशपांडे(आयआयए पुणे सेंटर चेअरमन),मंजु फडके.मृणालिनी साने(आर्किटेक्ट),प्रो.आलोक खोनसीकर,कमलेश फेरवानी(नियोजित अध्यक्ष),नितिन वाघ आदि मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना जयश्री देशपांडे यांनी आर्किटेक्ट फक्त इमारती,बगीचा,उद्योग यांसाठी फक्त डिझाईन करत नाही तर ग्राहक व नागरिक यांच्या जीवनशैलीची निर्मिती करतो.असे संगितले.मंजु फडके यांनी बोलताना आजकाल प्रचंड स्पर्धा वाढली आहे.मात्र अद्यावत माहिती व आपले कौशल्य याच्या द्वारे जगाची कवाडे आपल्यासाठी उघडतात असे संगितले. शेखर शेठ यांनी या क्षेत्रात फक्त कामच नाही तर नवनिर्मितीचा आनंद मिळतो असे संगितले. 

छायाचित्र :मार्गदर्शन करताना जयश्री देशपांडे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite