Peoples Media Pune header

Go Back

शेठ ताराचंद रामनाथ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागास आ.बच्चू कडू यांची भेट

04 Jun 2019

शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ रुग्णालयातील हेल्थकेअर मेडिकल फाउंडेशनच्या अतिदक्षता विभागात चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ति पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अतिदक्षता विभागाला भेट देवून पूर्ण वादाची व विषयाची सखोल माहिती घेतली.व हेल्थकेअर मेडिकल फाउंडेशनच्या अतिदक्षता विभागाला बंद होवू देणार नाही असे अश्वासन दिले.या करिता हवी ती मदत देण्याचे वचन देत,कायद्याने विषय सोडवण्याचे आणि त्यामध्ये रुग्णांचे कुठल्याही प्रकारे हाल होवू नये याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.प्रहार जनशक्ति पक्षातर्फे रुग्णसेवक मयम पुजारी,उमेश महाडीक,नितिन पगारे,नौशाद शेख,व मुंजा गोरे या प्रकरणावर मागील दोन महिन्यापासून लक्ष ठेवून असून या वादात रुग्णांचे हाल होत नाही ना याची काळजी घेत आहेत.आमदार बच्चू कडू भेटी प्रसंगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे व्यवस्थापक शेख महम्मद उपस्थित होते.

छायाचित्र :भेटी प्रसंगी बच्चू कडू,शेख महम्मद व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite