Peoples Media Pune header

Go Back

“व्यवसाय हा साधनांनी नाही तर उद्योजकाच्या मानसिकतेतून यशस्वी होतो”.-डॉ.आशिष

03 Jun 2019

व्यवसाय-उद्योग हा साधन सामुग्रीनेच नाही तर तो उद्योजकाच्या मनसिकतेने यशस्वी होतो.उद्योजकता ही एक मानसिकता आहे. साधन सामुग्री मिळवता येते मात्र मानसिकता निर्माण करावी लागते.उद्योजक अनेकदा आपल्या अपयशासाठी बाह्य परिस्थिति वर दोष देतो.मात्र योग्यतो आत्मविश्वास व ईच्छा शक्ति असल्यास सर्व परिस्थितीवर मात करता  येते” असे प्रतिपादन मानसतज्ञ डॉ.आशिष तवकर यांनी केले.लघुउद्योग भारती संस्थेच्या मासिक बैठकीत ते “उद्योजकीय मानसिकता” विषयावर मार्गदर्शन करीत होते.मनोहर हॉल एरंडवने येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी लघुउद्योग भारतीचे जिल्हा अध्यक्ष अमित घैसास,पुणे अध्यक्ष मनोज धारप,पुणे कार्यवाह नचिकेत फडके,राजेश जोशी आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते.

छायाचित्र :मार्गदर्शन करताना आशिष तवकर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite