Peoples Media Pune header

Go Back

पाल्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मोफत मार्गदर्शनासाठी,“तारे जमीन पर”ग्रुपची निर्मिती

21 May 2019

बदलत्या काळाबरोबरच मुलांचे पालन पोषण आव्हानात्मक झाले आहे.पाल्यांच्या शारीरिक स्वास्थ्यकडे पालक लगेच लक्ष ठेवतात.ते लवकर बरे व्हावेत म्हणुन योग्य वेळी औषध पाणी करतात. मात्र मुलांचे मानसिक स्वास्थ्य ही महत्वपूर्ण आहे.पाली व पालक यांच्यातील संवाद कमी होण्याने तसेच काही बाबींकडे म्हणावे तसे लक्ष जात नाही.मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी तज्ञ व्यक्तींचा सल्ला आवश्यक असतो.हे लक्षात घेवून पाल्यांच्या मानसिक स्वास्थ्यसाठी पालकांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी “तारे जमीन पर” ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे.याद्वारे पालकांना घरबसल्या त्यांच्या सोईनुसार तज्ञ व्यक्ति मार्गदर्शन करतील सेजल रे या प्रकल्पात समन्वय करीत आहेत. त्यांनी आपल्या पाल्यांना तज्ञ व्यक्तींचा सल्ला मोफत मिळावा,त्यांच्या समस्यांना व शंकांना उत्तरे मिळावी यासाठी या “तारे जमीन पर”ग्रुपची निर्मिती केली.या मध्ये शेजल रे,रोमल सुराणा,डिंपल साही,अर्पिता कथने,डॉ.पुजा धांडे,मृणाल सिसोदीया,अलका मिश्रा यांचा समावेश आहे.आनंदी पालक हे आपल्या पाल्याचे जीवन .आनंदी करू  शकतात.यासाठी पालकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.संपर्क मो.9545042118  

छायाचित्र :तारे जमीन पर ग्रुप 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite