Peoples Media Pune header

Go Back

जनस्फूर्ति सेवा ट्रस्टच्या वतीने देवळाची तालिम चौक येथे पाणपोईचे उद्घाटन

03 Apr 2019

मार्च महिन्यात सूर्य आग ओकत असतो व मानुष्यच काय प्राण्यांचीही काहिली होते.अशावेळी पाणपोई ही माणूस व मुक्या जीवांना पाणपोईचा आधार असते. हे लक्षात घेवून जनस्फूर्ति सेवा ट्रस्टच्यावतीने कै. शशिकांत खिंवसरा यांच्या स्मरणार्थ देवळाची तालिम चौक महात्मा फुले पेठ येथे पाणपोईचे उद्घाटन पोलिस निरीक्षक उत्तम चक्रे(खडक पोलिस स्टेशन)यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ट्रस्टचे संस्थापक तृषात प्रधान,अध्यक्ष विनोद कोंगे,रूपेशअप्पा पवार,महादेव कातुरे,श्रीनिवास कोंगे,विटठ्ल इराबत्तीन कृष्णा मेसरे,शाम मोडक,अजय माकम आदि मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.विशेष म्हणजे येथे मुक्या जांनावरांसाठीही पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक उत्तम  चक्रे यांनी समाजोपयोगी कामात पोलिसांना सामावून घेतल्या बद्दल आनंद व्यक्त केला.

छायाचित्र :पाणपोई उद्घाटन प्रसंगी उत्तम चक्रे,विनोद कोंगे,रूपेश पवार व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite