Peoples Media Pune header

Go Back

चित्र प्रदर्शनास प्रारंभ

29 Mar 2019

भारतीय कला प्रसारिणी सभेकडून चालविल्या जाणार्‍या बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग या पदवी अभ्यासक्रम विभागाच्या विद्यार्थ्यांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कायदे तज्ञ मनोज वाडेकर यांच्या हस्ते झाले कार्यक्रमास न्यासाचे सचिव पुष्कराज भा.पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या हस्ते दिवंगत सचिव भालचंद्र मोहिनिराज पाठक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणार्‍या पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनपर भाषणात वाडेकर म्हणाले विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती अतिचय मनमोहक आहेत,न्यास विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे अनेक कार्यक्रम अतिचय चांगल्या प्रकारे घेत आहे. याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल.न्यासाचे सचिव पाठक भाषणात म्हणाले की कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना जाहिरातीच्या युगामध्ये फार महत्व आहे.आणि हे लक्षात घेवूनच न्यासाचे दिवंगत सचिव भालचंद्र पाठक यांनी बी.एफ.ए पेंटिंग पदवी अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू केला.आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे.कार्यक्रमास प्रा.गजराज चव्हाण,प्रा.विलास चोरमले,प्रा.संजय भारती,प्रो.राहुल बळवंत,व मोठ्या संखेने विद्यार्थी उपस्थित होते. चित्रप्रदर्शन ३१ मार्च पर्यन्त सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे सर्वांकरिता खुले असणार आहे. विद्यार्थ्यांनी विशेष करून पेंटिंग,प्रिंटमेकिंग,पेन्सिल ड्रॉइंग,म्युरल्स,या विषयांवर अतिचय सुंदर अशा कलाकृती पेश केल्या आहेत.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मनोज वाडेकर,मोहिनीराज पाठक,व अन्य मान्यवर

 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite