Peoples Media Pune header

Go Back

अग्रसेन भगवान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ७ जोडप्यांचा मोफत सामूहिक विवाह संपन्न.

15 Mar 2019

अग्रसेन भगवान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ७ जोडप्यांचा मोफत बिगरहुंडा सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आले.गोयल गार्डन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात आयोजक रतनलाल हुकूमचंद गोयल,सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर व वर्‍हाडी मंडळी उपस्थित होती.वधूंना सोन्याचे मंगळसूत्र,चांदीची जोडवी,वधू व वरांना पोशाख आणि संसरोपयोगी वस्तु प्रदान करण्यात आल्या.सर्व वर्‍हाडी मंडळींना नाश्ता तसेच भोजन देण्यात आले.या प्रसंगी बोलताना सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी सामूहिक विवाह आणि बेटी बचाव अशा उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे संगितले.आयोजक रतनलाल गोयल यांनी सामूहिक विवाह ही एक चळवळ व्हावी असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :मोफत बिगरहुंडा सामूहिक विवाह प्रसंगी वधूवर व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite