Peoples Media Pune header

Go Back

आकाश अवतारे झाला upjilउपजिल्हाधिकारी.अ.जा प्रवर्गात दुसरा

21 Feb 2019

आयटी इंजिनियर असणारा आणि नुकताच उपजिल्हाधिकारी झालेला आकाश अमृत अवतारे हा एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून सतरावा व अ.जा.प्रवर्गातून दुसरा आला आहे.महानगरपालिकेच्या कोंढवा बुद्रुक शाळेत शिक्षक असणारे मोठे बंधू सुरज अवतारे सर हे त्याचे मार्गदर्शक आणि आई वडील हेच प्रेरणास्रोत आहेत.वडील अमृत अवतारे आणि आई आशा अवतरे दोघांनी मजुरी करून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले आहे.आकाशचे १ ली ते ७ वी पर्यंतचे पूर्ण शिक्षण जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झाले आहे.८ वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालय,लासोना.मूळ गाव समुद्रवाणी,ता.जि उस्मानाबाद ११ वीच्या वर्षात कला शाखेत ४ महिने शिकून सायन्समध्ये प्रवेश घेवून बारावी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण सायन्समधून पूर्ण केले.पुढील पदवीचे शिक्षण आयटी इंजिनियर शासकीय महाविद्यालय कराड येथून पूर्ण केले.यासाठी पाच वर्ष पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी स्वयंअध्ययन केले.कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता स्वयंअध्ययन,सातत्यपूर्ण कष्ट,जिद्द,आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याने यश अक्षरक्ष: खेचून आणले आहे.सुरुवातीला युपीएससी परीक्षेची दोनदा मुख्य परीक्षा दिली आणि आता एमपीएससी परीक्षेतून उपजिल्हाधिकारी पड मिळविले आहे.याविषयी आपले मत मांडताना आकाश अवतारे यांनी अभ्यास,जिद्द चिकाटी आणि आई वडिलांचे कष्ट भाऊ सुरज अवतारे याचा खंबीर पाठींबा यामुळे यश मिळाल्याचे नमूद केले

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite