Peoples Media Pune header

Go Back

तोंडी गुण रद्द करण्याच्या निर्णया विरोधात शिवसेना युवासेनेचा एसएससी बोर्डवर मोर्चा व निवेदन

01 Feb 2019

एसएससी बोर्डाने नुकतेच परिपत्रक काढून एसएससी (१० वि) तील भाषा व समाजशास्त्र विषयाचे अंतर्गत तोंडी परीक्षेचे २० मार्क रद्द केले.यामुळे सुमारे १५ लाख पंचाण्णव हजार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना युवासेनेच्या सदस्यांनी एसएससी बोर्डवर धडक मोर्चा काढला.व बोर्ड अध्यक्ष शकुंतला काळे आणि एससीआरटी मंडळाचे सुनील मगर यांना हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी केली.या प्रसंगी बाळाभाई कदम(संपर्कप्रमुख),साईनाथ दुर्गे(मुंबई मनपा शिक्षण मंडळ सदस्य),मुंबई विद्यापीठ सदस्य-,डॉ.सुप्रिया करंडे,सौ.गीता झगडे,रुपेश कदम,तसेच शहर प्रमुख मा.आ.चंद्रकांत मोकाटे,महादेव बाबर,नगरसेवक विशाल धनवडे,शहर समन्वयक योगेश काकडे,युवा सेना विभाग अधिकारी निरंजन दाभेकर,कुणाल धनवडे,परेश खांडके,राम थरकुडे,चेतन चव्हाण,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिवसेना युवासेना  शिष्टमंडळ सदस्यांनी या परिपत्रकामुळे मराठी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असून ते त्वरित रद्द करावे अशी मागणी केली.शकुंतला काळे व सुनील मगर यांनी हे निवेदन व आपली शिफारस शासनाकडे त्वरित पाठविण्यात येईल असे सांगितले.

छायाचित्र :निवेदन देताना शिवसेना युवासेना पदाधिकारी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite