Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब विज्डमच्यावतीने सारंग गोसावी यांना “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार” प्रदान.

01 Feb 2019

रोटरी क्लब विज्डमच्या वतीने सारंग गोसावी(असीम फौंडेशन) यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार,मेजर जनरल शशिकांत पित्रे(रिटा) याच्या हस्ते प्रदान करण्यात आला.गांधीभवन कोथरूड येथे नुकत्याच झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी मकरंद टिल्लू(रोटरी प्रांत सेवा प्रकल्प डायरेक्टर),रोटरी क्लब विज्डम अध्यक्ष रो.रजनी स्वामी,सेक्रेटरी रो.निलेश धोपडे,संयोजक रो.रोहित फडणीस,आदी मान्यवर उपस्थित होते.शाल,श्रीफळ,मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुर्ष्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना शशिकांत पित्रे यांनी सैन्य बाहेरील शत्रू बरोबर लढते,मात्र सामाजिक कार्यकर्ते देशाला आतून बळकटी देतात असे सांगितले.सत्काराला उत्तर देताना सारंग गोसावी यांनी आपले सेवाकार्य मैत्रीतून उभे राहिले आहे व त्यातूनच रोजगार,महिला सक्षमीकरण,खेळ यांचा विकास होत आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वर्णेकर यांनी केले.

छायाचित्र :डावीकडून निलेश धोपडे,मकरंद टिल्लू,शशिकांत पित्रे,सारंग गोसावी,रजनी स्वामी  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite