Peoples Media Pune header

Go Back

पच्छिम महाराष्ट्र कर सल्लागार असो.च्या वतीने अर्थसंकल्पाचे लाईव्ह प्रक्षेपण

01 Feb 2019

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला अर्थसंकल्प व त्याच्याशी सर्वात जास्त संबंध येणा-या करसल्लागारां साठी पच्छिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनने अर्थसंकल्पाचे थेट(लाईव्ह)प्रक्षेपणाचे आयोजन केले.यादव व्यापार भवन येथील संस्थेच्या मुख्यालयात याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी पच्छिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष नवनीतलाल बोरा माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे,उपाध्यक्ष मनोज चितळीकर,सचिव शरद सूर्यवंशी,सहसचिव श्रीपाद बेदरकर,आदी मान्यवरांच्या बरोबरच करसल्लागार उपस्थित होते.अर्थसंकल्प सादर होताना सदस्यांमध्ये त्याविषयी चर्चा व्हावी हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे नवनीतलाल बोरा यांनी नमूद केले.

छायाचित्र :अर्थसंकल्प चिकित्सकपणे पाहणारे करसल्लागार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite