Peoples Media Pune header

Go Back

हेल्मेट वापर जनजागृती बद्दल अभिनव कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रशस्तीपत्र प्रदान

30 Jan 2019

भारतीय कला प्रसारिणी सभा व वाहतूक शाखा पुणे शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच हेल्मेट वापराबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला होता.जनजागृती करिता अभिनव कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चत्र रेखाटून त्यावर हेल्मेट वापरा बाबत संदेश लिहून भावनिक आवाहन देखील केले होते.विद्यार्थ्यांनी जनजागृतीच्या कार्यात चित्ररुपी हातभार लावला म्हणून भा.क.प्र सभा न्यासातर्फे व वाहतूक शाखेतर्फे प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.तसेच तीन उत्कृष्ट्र चित्ररूपी संदेश देणा-या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.कार्यक्रमात न्यासाचे सचिव पुष्कराज भा.पाठक म्हणाले जनजागृतीच्या कार्यात विद्यार्थ्यांनी केलेले योगदान फार महत्वाचे आहे.अशा उपक्रमामधूनच विद्यार्थ्यांना विधायक समाज कार्याची आवड निर्माण होते.सहा.पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे म्हणाले कि,हेल्मेट सक्ती हा उपक्रम राबविण्या मागील मुख्य उद्देश नागरिकांची सुरक्षितता हाच आहे.जनजागृती कार्यात न्यासाने दिलेल्या श्योगाब्द्द्म मी सचिव पाठक व विद्यार्थ्यांचा आभारी आहे.कार्यक्रमास न्यासाचे सचिव पुष्कराज पाठक,सहा पोलीस आयुक्त नागनाथ वाकुडे,प्राचार्य विलास चोरमले,राहुल बळवंत(विभागप्रमुख),आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बळवंत यांनी केले.  

छायाचित्र :विद्यार्थी व मान्यवर यांचे समूहचित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite