Peoples Media Pune header

Go Back

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.

19 Jan 2019

हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.नेहरू स्टेडियम,स्वारगेट येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक उमेश गालिंदे(उपशहर प्रमुख),विशाल धनवडे(नगरसेवक),गजानन पंडित(शहर संघटक),स्वातीताई कथलकर(महिला आघाडी कसबा),राधिकाताई हरिश्चंद्रे,राहुल पारखे,सुलभा तळेकर,स्वाती मेंगडे,सम्राट लाड,देवेंद्र शेळके,योगेश खेंगरे,निलेश राऊत,रुपेश पवार,विकी तळेकर,ज्ञानंद कोंढरे,पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे स्पर्धा निरीक्षक संदीप पायगुडे,पंचप्रमुख संतोष जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत ६० किलो वजनी गटाचे ९० संघ,स्पर्धक १००८,व ७० किलो वजन गटातील ७० संघ-स्पर्धक ८४० उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना चंद्रकान मोकाटे यांनी सक्षम देश होण्यासाठी आरोग्यपूर्ण युवा आवश्यक आहे,खेळांमधून ते प्राप्त होते.असे सांगितले.ही स्पर्धा आज आणि उद्या दोन दिवस चालेल व उद्या बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल.

छायाचित्र :क्रीडास्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी चंद्रकांत मोकाटे,उमेश गालिंदे,विशाल धनवडे,महिला आघाडी व अन्य मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite