Peoples Media Pune header

Go Back

पो.नि.अशोक कदम व शिक्षिका वासंती जोशी यांना रोटरी मिड ईस्टचा “व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार”.प्रदान

17 Jan 2019

रोटरी क्लब मिड ईस्टच्या वतीने देण्यात येणारा व्यावसायिक गुणवत्ता(व्होकेशनल एक्सलंस)पुरस्कार स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम,तसेच माजी शिक्षिका व साहसी क्रीडा प्रकार जोपास-या प्रो.वासंती जोशी यांना माजी सुपरीटेंडेंट ऑफ पोलीस शंकर केंगार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी मिड ईस्टच्या अध्यक्ष निलीमा डोंगरे,सेक्रेटरी चेतन पेठे,सहाय्यक प्रांतपाल दीपा गाडगीळ आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.या प्रसंगी बोलताना शंकर केंगार यांनी पोलिसांना सहसा सत्कार मिळत नाहीत एक निगेटिव्ह मानसिकता समाजात असते.पोलीस मात्र अहोरात्र समाजात सुरक्षितता नांदावी म्हणून झटत असतात.त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे असे सांगितले.सत्काराला उत्तर देताना अशोक कदम यांनी पोलीस हा गणवेशातील नागरिक आहे व नागरिक हे गणवेश नसलेले पोलीस आहेत.व्यक्ती व समाजाने आपले सुरक्षितता जपण्यासाठी जागृत राहिले पाहिजे,असे सांगितले.वासंती जोशी यांनी साहसी क्रीडा प्रकाराने आत्मविश्वास वाढतो व एक ओळख प्राप्त होते असे सांगितले.   

छायाचित्र :डावीकडून चेतन पेठे,शंकर केंगार,अशोक कदम,वासंती जोशी,निलीमा डोंगरे,दीपा गाडगीळ  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite