हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कसबा विधानसभा मतदारसंघच्या वतीने कै.पद्मश्री रमाकांत आचरेकर(सर)यांच्या स्मरणार्थ टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा रविवार दिनांक २० जानेवारी रोजी कटारिया हायस्कूल,महाराष्ट्र मंडळ येथे सकाळी ९ वाजता सुरु होईल.उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट,श्रीरंग अप्पा बारणे(खासदार)यांच्या हस्ते होईल.तसेच शनिवार दिनांक २६ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ यावेळात अ) १ ली २ री,ब)३ री ४ थी,क)५ वी ते ७ वी,ड)८ वी ते १० वी अशा चार गटात वर्तक उद्यान येथे संपन्न होईल या सर्व संयोजनात निरंजन दाभेकर(कसबा अध्यक्ष युवा सेना)मयूर कडू(विभागप्रमुख कसबा मतदारसंघ),विशाल धनवडे(नगरसेवक),राहुल पारखे आदींचा सक्रीय सहभाग आहे.
© 2011. Peoples Media Pune