Peoples Media Pune header

Go Back

अभिनव कला महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

16 Jan 2019

अभिनव कला महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरे झाले.भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाने या वर्षी पासून कला प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणा-या १० विदयार्थ्यांना स्व.भालचंद्र मोहिनीराज पाठक यांच्या स्मृतिप्रित्यर्थपारितोषिके प्रदान केली.नव्याने दिल्या जाणा-या पारितोषिकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पहायला मिळाला.यावेळी बोलताना न्यासाचे सचिव पुष्कराज पाठकम्हणाले की विद्यार्थ्यांनी  सादर केलेल्या उत्कृष्ट कलाकृतींमुळेच प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.विद्यार्थ्यांच्या कलेविषयी आम्हाला अभिमान आहे.राज्यस्तरीय कला प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी त्यान वाटणारी सर्वोत्कृष्टच होती,न्यासाचे प्रशासन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी येथून पुढे देखील वेगवेगळे उपक्रम राबविणार आहे.महाविद्यालयाकडून दिल्या जाणा-या पारितोषिकांचे देखील वितरण यावेळी करण्यात आले.कार्यक्रमास न्यासाचे सचिव पुष्कराज पाठक,प्राचार्य विलास चोरमले,विभागप्रमुख राहुल बळवंत,,धनंजय सस्तकर तसेच मोठ्या संखेने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.जीएस अभिषेक आसोरे व एलआर आराधना सुतार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.कार्यक्रम अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती यथे संपन्न झाला.

छायाचित्र :पुष्कराज पाठक,राहुल बळवंत,धनंजय सस्तकर व  विद्यार्थी  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite