Peoples Media Pune header

Go Back

ग.दि माडगुळकर,सुधीर फडके,आणि पु.ल.देशपांडे यांना जन्मशताब्दीनिमित्त स्वरमयी मानवंदना.

15 Jan 2019

ग.दि.माडगुळकर सुधीर फडके,आणि पु.ल देशपांडे या तीनही दिग्गज कलावंताना जन्मशताब्दी निमत्त मानवंदना देण्याकरता मयूर कॉलनी येथील स्वरमयी क्लासेसचे वार्षिक संमेलन साजरे करण्यात आले.या तिघांची गाणी तुझे गीत गाण्यासाठीया नावाने झालेल्या या मैफिलीत लहान,थोर,सर्व विद्यार्थ्यांनी तयारीने सादर केली.वेदमंत्राहून आम्हा या स्फूर्तीगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.नाच रे मोरा,चंदाराणी,सारखी बालगीते,आकाशी झेप घे रे,थकले रे नंदलाला,एकवार पंखावरुनी सारखी भावगीते,कानडा राजा,देव देव्हा-र्यात नाही,कौशल्येचा राम बाई सारखी भक्तिगीते,पदरावरती जरतारीचा ही लावणी अशी सर्व प्रकारची गीत गुरु राजश्री ताम्हनकरांनी बसवून घेतली होती.हसले मनी चांदणे,जिवलगा कधी रे येशील तू ही गीते राजश्री ताईंनी उत्तम सादर केली.तसेच गीतरामायणातील गीतांनी या सर्वांवर कळस चढविला.स्वानंद जवळेकर व भावना टिकले यांची तबला साथ होती,ओंकार पाटणकर किबोर्ड तर संपदा देशपांडे आणि अमृता जवळेकर यांची हार्मोनियमवर साथ होती.अथर्व केळकर याने तालवाद्य,डफ,झेंबे अशा वाद्यांनी साथ केली.पालक आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद संमेलनाला लाभला.वीणा केळकर यांनी अभ्यासपूर्ण निवेदन केले.हॅपी कॉलनीच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

छायाचित्र :तुझे गीत गाण्यासाठी,सादर करताना विद्यार्थी कलाकर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite