Peoples Media Pune header

Go Back

“आपण डिप्रेशन-नैराश्यग्रस्त आहोत हेच संबंधित व्यक्ती व जवळच्या लोकांना समजून येत नाही,हे चिंताजनक”,डॉ.आशिष तवकर.

11 Jan 2019

 जगातील व भारतातील आत्महत्येच्या प्रमाणात मोठा वाटा नैराश्य-डिप्रेशनचा आहे.मात्र दुर्दैव असे की आपण डिप्रेशन-नैराश्यग्रस्त आहोत हेच संबंधित व्यक्ती व त्याच्या जवळपासच्या व्यक्तींना कळत नाही,असे प्रतिपादन डॉ.आशिष तवकर यांनी केले.ते रोटरी क्लब फोर्च्यून आयोजित डिप्रेशन-नैराश्य कारणे व उपायया व्याख्यान प्रसंगी बोलत होते.काहीही करावे न वाटणे,लोकांपासून दूर होणे,एकदम शांत अथवा एकदम रागीट होणे ई लक्षणे मूड म्हणून समजली जातात,सामाजिक,आर्थिक,वैय्यक्तिक,अथवा हार्मोनल चेंज मुळे हे होते.व लवकर निदान झाल्यास समुपदेशन व औषधोपचार याने यावर मात करता येते असे त्यांनी पुढे सांगितले.फर्ग्युसन कॉलेज अल्युमिनी हॉल येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रो.डॉ.दीपक तोष्णीवाल,रो.सारिका रोडे,रो.असित शहा,रो.विनिता सहदोत,रो.राजेंद्र सोनार आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक देखील उपस्थित होते.

छायाचित्र :डॉ.आशिष तवकर,दीपक तोष्णीवाल व नागरिक यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite