Peoples Media Pune header

Go Back

अभिनव कला महाविद्यालयाचे ७९ व्या चित्रप्रदर्शनास सुरुवात

09 Jan 2019

भारतीय कला प्रसारिणी सभा स्वर संचलित अभिनव कला महाविद्यालय टिळक रोड च्या ७९ व्या चित्रप्रदर्शनास नुकतेच पंडित भीमसेन जोशी कला दालन पुणे येथे उत्साहात सुरुवात झाली.चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन न्यासाचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक यांच्या हस्ते झाले.प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी केलेल्या चित्रकृती लावण्यात आल्या आहे.चित्रकृती ह्या अतिचय मनमोहक आहेत.हाताने काढलेली चित्रे जणू फोटो काढल्यासारखी वाटत आहेत.विशेष करून,व्यक्तीचित्रण, कॅलीग्राफी,कॉम्पोझीशन,फोटोग्राफी इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांनी कलाकृती पेश केल्या आहे.न्यासाच्या सचिवानी भाषणात विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले.त्यांनी या वर्षीपासून १० विद्यार्थ्यांना न्यासाकडून दिवंगत सचिव भालचंद्र मोहिनीराज पाठक यांच्या नावाने बक्षीस देण्याचेही जाहीर केले,त्यामुळे विद्यार्थी खूप खुश झाले.तसेच प्रदर्शनामध्ये फोटोग्राफीच्या विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधन करीत एक छोटी फिल्म तयार केली आहे.त्यामध्ये अपघातानंतर आसपासचे लोक पिडीताना मदत करण्यापेक्षा झाल्या प्रकारचे मोबाईलवर शुटींग घेत बसतात.तसे न करता पिडीतांना त्वरित मदत करा हे दर्शविणारी चित्रफीत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.अभिनव कलाचे प्रदर्शन पाहण्याकरिता दरवर्षी नागरिकांमध्ये खूप उत्सुकता असते.प्रदर्शन सर्वांकरिता दि.१२/०१/२०१९ पर्यंत खुले असणार आहे.कार्यक्रमास न्यासाचे अध्यक्ष जयदीप लडकत,सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक,प्राचार्य विलास चोरमले,विभागप्रमुख राहुल बळवंत,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,सर्व विद्यार्थी व मोठ्या प्रमाणावर पालक देखील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.एस.अभिषेक असोरे व एल.आर.अनुराधा सुतार यांनी केले 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite