Peoples Media Pune header

Go Back

क्युबिक्स अॅकॅडेमियाच्यावतीने विद्यार्थीनीना स्कूल बॅग व स्टेशनरी वाटप.

07 Jan 2019

परदेशी शिक्षणासाठी जाण-र्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणा-या क्युबिक्स अॅकॅडे मियाच्यावतीने वडकी येथील अनुसूचित जाती,जमाती निवासी शाळेतील विद्यार्थीनीना स्कूल बॅग,स्टेशनरी व सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्यात आले. कोरेगाव पार्क येथील हॉट फुट कोरेगाव पार्क अॅनेक्स येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी क्युबिक्स अॅकॅडेमियाचे संचालक बालूकेश्वर नाथ अग्रवाल,रो.दीपक तोष्णीवाल,भरत गुरव,शाळेचे संचालक श्री मोराळे.आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी या मुलीनी क्युबिक्स अॅकॅडेमियाच्या विद्यार्थ्यानसोबत क्रिकेटचा आनंदही घेतला.या प्रसंगी बोलताना बालूकेश्वर नाथ अग्रवाल यांनी मुलींच्या शिक्षणात मदत करणे हे सर्व संस्थांनी उद्दिष्ट ठेवल्यास देशाच्या प्रगतीस गती मिळेल असे सांगितले.रो.डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी रोटरीच्या सेवा कार्याची माहिती दिली.श्री मोराळे यांनी आभार मानले.

छायाचित्र : मान्यवर,खेळाडू,व विद्यार्थिनी यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite