Peoples Media Pune header

Go Back

रावबहादुर द.ब.पारसनीस लिखित “झाशीची राणी,पुस्तकाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव,रोटरी गणेशखिंडने साजरा केला.

05 Jan 2019

सध्या मनकर्णिका द क्वीन ऑफ झासी हा सिनेमा सोशल माध्यमातून चर्चेत आहे.मराठीत सर्वप्रथम झांशीच्या राणीचे चरित्र सातारा येथील प्रसिद्ध इतिहास संशोधक रावबहादुर द.ब.पारसनीस यांनी लिहिले होते.योगायोगाने यंदा या पुस्तकाच्या प्रसिद्धीला यंदा १२५ वर्ष पूर्ण होत आहेत.१८९४ साली रावबहादुर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांनी लोकहितवादी सरदार रावबहादुर गोपाळराव हरी देशमुख(लोकहितवादी) यांचेकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे व लोकमान्य टिळक यांचेकडून मिळालेल्या प्रोत्साहनातून संशोधन करून हे चरित्र प्रकाशित केले होते.या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब गणेशखिंडतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा.राधिका सेशन यांचे १८५७ स्वातंत्र्यलढ्यात झांसीच्या राणीचे कर्तुत्वया विषयावर भाषण आयोजित केले होते.यावेळी प्रा.सेशन यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात झांशीच्या राणीचे योगदान खूप मोठे आहे असे सांगून हल्लीच्या तरूण मुलींनी झांशीच्या राणीसारखे स्वरक्षण करण्यासाठी सिद्ध व्हावे असा सल्ला दिला.या प्रसंगी रावबहादुर द.ब.पारसनीस स्मृती समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र पारसनीस यांनी प्रास्ताविक केले.समितीचे सदस्य डॉ.सुधांशु गोरे,गणेशखिंड रोटरी क्लबचे अध्यक्ष सुभाषजी म्हेत्रे,सचिव सुनिता पारसनीस व क्लबचे सदस्य उपस्थित होते.

छायाचित्र :झाशीची राणी,पुस्तकाचे १२५ वर्षपूर्ती निमित्त मान्यवर व रोटरी सदस्य यांचे समूहचित्र   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite