Peoples Media Pune header

Go Back

जे ४ ई च्या वतीने स्व.सरोज मेठी यांचा जन्मदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा

04 Jan 2019

आपल्या दिवंगत माता पिता यांचे पुण्यस्मरण दिन काही उपक्रम करून करण्याची सर्वसाधारण परंपरा आहे.मात्र आपल्या स्वर्गीय आईचा वाढदिवस जे ४ ई चे संस्थापक विशाल मेठी यांनी महात्मा गांधी शाळेतील गरजू विद्यार्थ्यां सोबत साजरा केला.त्यांना पुस्तके व मिठाई वाटप केले.या कार्यक्रमाचे एक वैशिष्टय म्हणजे ८ वर्षीय सिद्धी मेठी हिने विद्यार्थ्यांना स्वतःची  साफ सफाई कशी करावी याची माहिती दिली.तसेच फक्त स्वतःपुरतेच नव्हे तर शाळा,घर,व परिसर कसा स्वच्छ ठेवावा याचे मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांबरोबर विविध खेळ खेळले व नृत्य ही केले. 

छायाचित्र :विद्यार्थ्या सोबत विशाल मेठी,सिद्धी मेठी व अन्य  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite