Peoples Media Pune header

Go Back

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी केले अभिवादन.

03 Jan 2019

भरतीय स्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी सारसबागे समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी,स्री आधार केंद्र पुणे येथील कार्यकर्ते,सावित्रीबाई फुले महिला मंडळ आदींचे सदस्य उपस्थित होते.यात शेलार गुरुजी,अनिता शिंदे,पल्लवी जावळे,अशोक हरणावळ,तम्मा विटकर,सुरज लोखंडे,आश्लेषा खंडागळे,शिल्पा गवळी,प्रतीक्षा ढमढेरे,अनिता परदेशी,किशोर राजपूत,स्वाती ढमाले,वर्षा साबळे,नसीम शेख,पंकज जावळे,हरीश परदेशी,चंद्रशेखर कोरडे, अतुल क्लापुरे यांचा समावेश होता.या प्रसंगी बोलताना आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी आज क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले जयंती आहे.मात्र आजच वर्तमानपत्रात विवाहितेची कौमार्य चाचणी विषयक बातमी आली आहे.जातपंचायत विरोधी कायदा झाला असून आपण स्वतः त्यात पुढाकार घेतला होता तरीसुद्धा अशी घटना घडली व तक्रार नसळी तरी सामाजिक कार्यकर्ते व पोलीस यांनी पुढाकर घेवून सम्बन्धित पंचांवर कारवाई व्हावी.यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आपण पाठपुरावा करणार आहे.तसेच शबरीमला येथे महिलां घेतलेल्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केले हे बरोबर नाही.थोडक्यात राज्यात व देशात समाजसुधारणेचा बराच टप्पा गाठणे बाकी आहे असे सांगितले.`

छायाचित्र :सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करतांना आ.डॉ.नीलमताई गो-हे व मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite