Peoples Media Pune header

Go Back

“सन १९८१” हा मराठी चित्रपट २५ जानेवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित.

11 Dec 2018

 सन १९८१,म्हणजे एक विचारक्रांती आहे.स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जातिभेदाचा आधार घेवून आपली परंपरा जपणा-या संस्कृतीवर टिकास्र म्हणजे हा चित्रपट आहे.पूर्वापार चालत आलेल्या परंपरा मोडीत काढताना मोठा प्रतिकार करावा लागतो.त्याच प्रतिकाराचा एक इतिहास हा चित्रपटात मांडलेला आहे.हा इतिहास घडत असतांना शिक्षित आणि अशिक्षित यांच्या लढाईत घडते एक प्रेमकथा कि ज्याला पाप समजल जात.मग या पापाला दिली जाते एक भयानक शिक्षा.त्यातून खेळला जातो न जिंकणारा खेळ.हा खेळ जिंकला,तरच नष्ट होणार आहे जातीभेद आणि यशस्वी होणार आहे एक अबोल प्रेमकथा. हीच प्रेमकथा ताकद देते एका लढाईला.ही लढाई,त्यात एक अबोल प्रेम कथा,त्यातून घडणारे प्रासंगिक विनोद व शेवटपर्यंत न सुटणारे रहस्य चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.हीप्रेम कथा यशस्वी होते का ?,यासाठी कोणता खेळ खेळला जातो ?,या खेळात कोन जिंकणार ?,आणि त्या परंपरेचे काय ? याची उत्तरे मिळतील सन १९८१चित्रपटातून.या चित्रपटाला NIFF फिल्म फेस्टिव्हलचे पाच नॉमिनेशन होते.त्यातून बेस्ट ग्रामीण चित्रपट व स्नेहा सावोजी यांना बेस्ट सहअभिनेत्री असे दोन अॅवोर्द मिळाले.या चित्रपटाची निर्मिती एस के आर्ट प्रोडक्शनने केली आहे.या प्रोडक्शनचा हा दुसरा चित्रपट आहे.या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन शिवा बगुल यांचे आहे.यात कलाकार म्हणून योगेश तनपुरे,राधिका देशमुख,नागेश भोसले,राजदत्त सर,सुनील गोडबोले,जयमाला इनामदार असे कलाकार आहेत.या चित्रपटाला संगीत पराग फडकर यांचे असून आदर्श शिंदे यांनी गीत गायले आहे.सन १९८१हा चित्रपट सिक्स सेन्स फिल्म प्रोडक्शन कडून येत्या २५ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज केला जातोय.तरी आपण या चित्रपटाला योग्य प्रसिद्धी द्यावी ही नम्र विनंती 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite