Peoples Media Pune header

Go Back

द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटंटस ऑफ इंडियाच्या नूतन वस्तूचे मा.प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

09 Dec 2018

द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटंटस ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या नवीन शैक्षणिक संकुलाचे उदघाटन रविवार पुणे शाखेच्या नवीन शैक्षणिक संकुलाचे उदघाटन केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.कर्वेनगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक, द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकौंटंटस ऑफ इंडियाचे अध्यक्ष CMA अमित आपटे,उपाध्यक्ष CMAबलविंदर सिंग,पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा  CMAमीना वैद्य,उपाध्यक्ष CMAरवींद्र आर्वीकट्टी,व्यवस्थापकीय अधिकारी CMAसंदीप जोशी,खजिनदार CMAचैतन्य मोहरीर,सेक्रेटरी CMAअमित शहाणे,सल्लागार डॉ.संजय भार्गवे आदी मान्यवरांच्या बरोबरच कॉस्ट अकौंटंटस मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी बचत ही फक्त पैशाची नसावी तर वेळेची व साधनसामुग्री(रिसोर्सेस)ची सुद्धा हवी,मेडिकल कॉलेज रास्त फी व अन्य प्रकल्पांच्या माहिती विषयक गटांमध्ये कॉस्ट अकौंटंटसचा या पुढे समावेश करणार असल्याचे सांगितले.या वस्तूसाठी विशेष परिश्रम घेणारे CMAधनंजय जोशी व त्यांच्या सौ. यांचा जावडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुमारे १० कोटी खर्च झालेली ही प्रशस्त व अद्यावत वस्तू विद्यार्थी, कॉस्ट अकौंटंटस यांना उपयुक्त ठरेल असे अमित आपटे यांनी सांगितले.

छायाचित्र:उद्घाटन प्रसंगी डावीकडून बलविंदर सिंग, अमित आपटे,प्रकाश जावडेकर,मुक्ताताई टिळक,

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite