Peoples Media Pune header

Go Back

३९ चित्रकारांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे पंकज शहा यांच्या हस्ते उदघाटन

04 Dec 2018

क्रिएटीव्ह मास आर्ट हाउसच्या वतीने आयोजित ३९ चित्रकारांच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रोटरी प्रांत ३१३१ चे सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर रो.पंकज शहा यांच्या हस्ते करण्यात आले राजा रविवर्मा आर्ट गॅलेरी, घोलेरोड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी वत्सला पांडे(क्रिएटीव्ह मास आर्ट हाउस),रो.रवींद्र पाटील,रो.अजय वाघ,निशा पाटील आदी मान्यवरांच्या बरोबरच चित्रकार,कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना पंकज शहा यांनी चित्रकला ही प्राचीन कला असून ती मनाला आनंद देते.असे सांगितले.याप्रदर्शनात ८० चित्रे  असून दिनांक ३ डिसेंबर ते ६ डिसेंबर नागरिकांना विनामुल्य खुले आहे.

छायाचित्र :प्रदर्शन पाहताना डावीकडून वत्सला पांडे,पंकज शहा,रवींद्र पाटील व अजय वाघ. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite