Peoples Media Pune header

Go Back

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा उभारून कसबा विभागाची आदरांजली

17 Nov 2018

हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवसेना कसबा विधानसभा मतदारसंघच्या वतीने त्यांचा अर्धपुतळा निर्मितीने आदरांजली वाहण्यात आली.खडकमाळ आळी शिवसेना शाखा येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.याची संकल्पना विभागप्रमुख चंदन साळुंके यांची होती.या प्रसंगी विभागप्रमुख चंदन साळुंके,विभागप्रमुख मयूर कडू,युवासेना कसबा विधानसभा अध्यक्ष निरंजन दाभेकर,उपविभाग प्रमुख अशोक येनपुरे,राहुल पारखी विजयाताई मोहिते,सुलभा तळेकर,अजिंक्य पांगारे,विकी तळेकर,पंकज बरीदे,भरत चौधरी, आदी मान्यवरांच्या बरोबरच शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.अशा प्रकारचा पुण्यातील हा पहिलाच अर्धपुतळा असल्याचे चंदन साळुंके यांनी नमूद केले.तसेच पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

छायाचित्र :डावीकडून राहुल पारखी,चंदन साळुंके,निरंजन दाभेकर,मयूर कडू,अनिल येनपुरे 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite