Peoples Media Pune header

Go Back

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी प्रशासन तयारी,व देवस्थान येथील अपूर्ण बांधकाम संबधी आ.डॉ.नीलमताई गो-हे यांची विभागीय आयुक्तां बरोबर आढावा बैठक

16 Nov 2018

आगामी कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे प्रशासनाने केलेली तयारी,तसेच पंढरपूर देवस्थान येथे २००७ पासून सुरु झालेले ७ कोटी १४ लाख खर्चाचे व त्यातील २ कोटी ४ लाख तीस हजार रुपयातील बराच हिस्सा लोकप्रतिनिधींच्या निधीतून मिळूनही अद्याप अपूर्ण राहिलेल्या कामांसंबधी शिवसेना प्रवक्ता(कॅबिनेट दर्जा प्राप्त)आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या बरोबर आढावा बैठक घेतली.विधान भवन पुणे येथे झालेल्या बैठक प्रसंगी सचिन ढोले(प्रांत अधिकारी),अभिजित बापट(मुख्य अधिकारी),हनुमंत बगल(सार्वजनिक बांधकाम खाते),सुदीप चमारिया(इंजिनिअरींग विभाग),सुनील उंबरे(पत्रकार),संदीप केंदळे(शहर प्रमुख),अतुल राजूरकर(युवासेना सहसचिव),आदी उपस्थित होते.या बैठकीत देवस्थान येथील अपूर्ण कामाबद्दल ते स्वखर्चाने पूर्ण करण्याचे देवस्थानने मान्य केले.तसेच ब-याच कामांसाठी सरकारी विविध विभागांकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागतो हे लक्षात घेवून विभागीय आयुक्तांनी या देवस्थानांसाठी एक समन्वय अधिकारी नेमण्याचे मान्य केले.तसेच पंढरपूर येथील विविध कामातील प्रशासकीय बाबींवर योग्य ते सहाय्य करण्यात येईल असे आयुक्तांनी बैठकीत सांगितले.आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी या विषयांवर आपण अनेकदा विधान परिषदेत पाठपुरावा केला होता.व आगामी अधिवेशनात ही याचा पाठपुरावा करू असे सांगितले.तसेच बैठकीत झालेल्या सकारात्मक निर्णया बद्दल समाधान व्यक्त केले.व यांची अंमल बजावणी योग्य रीतीने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite