Peoples Media Pune header

Go Back

सुर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या ओमकार लबडे याची विभागीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

13 Nov 2018

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यलय पुणे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विभागीय कराटे स्पर्धेत सुर्यदत्ता पब्लिक स्कूलचा ओमकार लबडे यांने प्रथम क्रमांक मिळविला व त्याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सदर स्पर्धेमध्ये विविध विभागातील एकूण ७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे पार पडल्या.१९ वर्षाखालील मुले या वयोगटात अतिचय चांगली कामगिरी करत त्याने प्रथम क्रमांक पटकवला.ओमकार हा ११ वी कला या वर्गात शिकत आहे.सुर्यदत्ता मध्ये नेहमीच खेळ व शारीरिक शिक्षण या विषयाला प्रधान्य दिले जाते.व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त खेळांमध्ये सहभागी होऊन संस्थेचे नाव उंचवावे यासाठी संस्थेमार्फत खेळाडूंना सुसज्ज मैदान, व्यायामशाळा,तज्ञ प्रशिक्षक अशा सुविधा पुरविल्या जातात.सदर यशाबद्दल संस्थेचे संस्था विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया,उपाध्यक्ष सुषमा चोरडिया,तसेच संस्थेचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.निशिगंधा पाटील व प्रा.संकेत नालकर यांनी अभिनंदन केले तर संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संजय चोरडिया यांनी ओमकारला विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र देवून त्याचा गौरव केला.तसेच पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite