रोटरी क्लब ऑफ हडपसर सेन्ट्रल व रूपा फौंडेशन यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत दीपावली पहाट दीपोत्सव व फराळ वाटपाचा कार्यक्रम माहेर वात्सल्यधाम आव्हाळवाडी येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.या वेळी मुलगी वाचवा,मुलगी जगवा हा संदेश देण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी मुलगी वाचवाचे प्रणेते डॉ.गणेश राख,माहेर व्यवस्थापिका सुप्रभाताई आल्हाट,रोटरी क्लबचे अध्यक्ष वामनराव भुरे,सेक्रेटरी महेंद्र लुणिया,खजिनदार डॉ.राकेश रांका,सचिन तुपे,संपत खोमणे,बन्सीलाल भगत,देवेंद्र सरडा,चित्रा भुरे,शारदा लुणिया,दिपाली महाजन,आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच अध्यक्ष भुरे यांची नात तिशा भुरे हिच्या वाढदिवसा प्रीत्यर्थ संस्थेस देणगी देण्यात आली.
छायाचित्र:वात्सल्यधाम येथे दिवाळी साजरी करताना रोटरी व रूपा फौंडेशन पदाधिकारी व सदस्य
© 2011. Peoples Media Pune