Peoples Media Pune header

Go Back

जैन सोशल ग्रुप्सच्या नारी संघटनच्यावतीने दिवाळी मेळावा प्रदर्शन

26 Sep 2018

जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल नारी संघटनच्या वतीने महिला उद्योजकांच्या दिवाळी मेळावा,प्रदर्शनाचे महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.ओसवाल बंधू कार्यालय सेव्हन लव्हज चौक यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक विद्या जैन(अध्यक्ष),शरदभाई शहा(जेएसजी इंटरनॅशनल माजी अध्यक्ष),प्रवीण चोरबेले(नगरसेवक),अनिता शहा(संस्थापक अध्यक्ष),दिलीप चोरबेले साधिका प्रज्ञाजी आदी मान्यवरांच्या बरोबरच अन्य क्षेत्रातील पदाधिकारी व महिला उद्योजक उपस्थित होते.या एक दिवसीय मेळाव्याचे हे सातवे वर्ष आहे.येथे दिवाळीसाठी लागणारे पदार्थ,वस्तू तसेच अन्य वस्तूंचे १५० स्टॉल्स होते.याप्रसंगी बोलताना मुक्ताताई टिळक यांनी महिलांमध्ये उद्योजकता वाढत आहे.व घर सांभाळून ही अनेक महिला यशस्वीपणे उद्योग चालवीत आहेत.त्यांनी आपल्या विकासासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

छायाचित्र :प्रदर्शन पाहताना मुक्ताताई टिळक,विद्या जैन व अन्य मान्यवर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite