Peoples Media Pune header

Go Back

बीएनआय उडानचे उद्घाटन संपन्न

26 Sep 2018

व्यवसायिकांनी एकमेकांना मदत करून आपला व्यवसाय वाढवावा या हेतूने कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था बीएनआयच्या पुण्यातील उडान,या शाखेचे उद्घाटन रेसिडेन्सी क्लब येथे संपन्न झाले,डॉ.समीर डोलारे यांनी अध्यक्षपदी निवड करण्यात आली.या प्रसंगी बीएनआय पुणे पूर्वचे कार्यकारी संचालक भरत डागा आणि अतुल जोगळेकर,स्थापना संचालक साकेत देमापुरे,स्थापना प्रतिनिधी दीपक तोष्णीवाल,व गीता शेठी-कपूर,सहाय्यक स्थापना संचालक प्रकाश कलंत्री आदी मान्यवरांच्या बरोबरच सुमारे २०० उद्योजक उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना भरत डागा यांनी व्यवसायिकांसाठी स्पर्धा महत्वाची असतेच मात्र स्पर्धेने होणा-या यशापेक्षा व्यवसायिकांनी परस्पर सहकार्याने जास्त प्रगती होते व ती टिकाऊ असते असे सांगितले.

छायाचित्र :बीएनआय उडान सदस्य व मान्यवर यांचे समूहचित्र   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite