Peoples Media Pune header

Go Back

ओडीसी नृत्याच्या “गीत गोविंदा”,महोत्सवाचे ३० सप्टेंबरला आयोजन.

25 Sep 2018

नृत्यंमधु डान्स स्कूल व राष्ट्र सेवा प्रतिष्ठान,पुणे आणि सांस्कृतिक विभाग ओडीसा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी संकली ५ ते ८ वाजता गीत गोविंदा.महोत्सवाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड,पुणे.येथे करण्यात आले आहे.गीत-गोविंद हे भारतीय साहित्य क्षेत्रात संस्कृत भाषेतील अतिचय प्रभावी साहित्य मानले जाते.याची रचना १२ व्या शतकातील सुप्रसिध्ह साहित्यकार श्री जयदेव यांनी केली आहे.या साहित्यातील १२ भागांमध्ये कृष्ण आणि राधा यांच्यातील रासलीला तसेच त्यांचे गोपिकां बरोबरच्या प्रेम रसाचे वर्णन केलेले आहे.या महोत्सवात नृत्यमधु डान्स स्कूलचे विद्यार्थी आणि गुरु मधुमिता मिश्रा गीतगोविंदावर आधारित ओडीसी नृत्य सादर करणार आहेत त्याबरोबरच प्रसिध्द नृत्यांगणा गुरु शमा भाटे संरचित कथ्थक नृत्य त्यांच्या नादरूप संस्थेचे विद्यार्थी आणि भरतनाट्यम नृत्य नृत्योन्मेष ग्रुप सादर करणार आहेत.प्रवेश सर्वांना मोफत आहे.तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite