Peoples Media Pune header

Go Back

सेवासिद्धी फौंडेशन तर्फे २६ सप्टेंबरला चॅरिटी शोचे आयोजन

21 Sep 2018

सेवासिद्धी फौंडेशन तर्फे एक शाम बाबा रामदेवजी के नामया माध्यमातून चॅरिटी शोचे आयोजन केले आहे.बचपन वर्ल्ड फोरम,पुणे तसेच सोलापूर येथील स्नेहालय या सामजिक संस्थाना मदत करण्याच्या हेतूने राजस्थानी सांस्कृतिक संगीत संध्याचे आयोजन येत्या २६ सप्टेंबर २०१८ ला गणेश कला क्रीडा मंच,स्वारगेट येथे सायंकाळी ५ ते १० यावेळेत केले आहे.या कार्यक्रमाला मा.ना.गिरीशजी बापट(पालकमंत्री),मा.ना.दिलीपभाऊ कांबळे(सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र),मा.मुक्ताताई टिळक(महापौर पुणे),मा.माधुरीताई मिसाळ(आमदार भाजप),मा.मोहनदादा जोशी अशा अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे,याच सोबत समस्त अखिल भारतीय राजस्थानी समाजाच्या प्रतिनिधींचा सहभाग असणार आहे.या कार्यक्रमात राजस्थानचे सांकृतिक नृत्य व गाणे सादर केले जाणार असून यामध्ये १५ राजस्थानी गायक व त्यांच्या समुहाद्वारे सुप्रसिध्ह गायक राणी-रंगीली व अर्जुन राणा यांचा समावेश आहे.अशी माहिती संस्थेच्या संस्थापक रोशनी जैन व कार्याध्यक्ष पुष्पा कटारिया यांनी दिली.सेवासिद्धी फौंडेशन सामाजिक संघटन,महिलांचे सशक्तीकरण तसेच शैक्षणिक,मेडिकल,व पर्यावरण क्षेत्रात २००८ पासून कार्यरत आहे.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite