Peoples Media Pune header

Go Back

करसल्लागारांच्या देशव्यापी समितीचे पहिले अधिवेशन पुण्यात.

19 Sep 2018

करसल्लागारांची देशव्यापी समिती नॅशनल अॅक्शन कमिटी ऑफ जीएसटी प्रोफेशनल.या देशव्यापी समितीचे पहिले अधिवेशन दिनांक गुरुवार दिनांक २० सप्टेंबर रोजी होत आहे.हे अधिवेशन पच्छिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशन,पुणे,यादव व्यापार भवन शुक्रवार पेठे,वनराज मंडळा समोरील मुख्यालयातील सभागृहात दुपारी १ ते ५ या वेळेत संपन्न होणार आहे.यावेळी राष्ट्रीय समन्वयक अॅड.अक्षत व्यास,अॅड.निगम शाह,राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड.दीपक बापट,महाराष्ट्र प्रभारी अॅड.किशोर लुल्ला,प्रकाश जोगळेकर,आणि प्रत्येक जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत असे पुणे जिल्हा समन्वयक नरेंद्र सोनवणे यांनी नमूद केले आहे.

नॅशनल अॅक्शन कमिटी ऑफ जीएसटी प्रोफेशनलची स्थापना अहमदाबाद येथे झाली असून २७ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशातील २२५ प्रतिनिधी होते.करदात्यांना कर भरण्यात सुलभता आणणे,करसल्लागारांन सतत प्रशिक्षित करणे,तसेच कायदेतज्ञ व करसल्लागारांना वस्तू व सेवा कर कायद्याअंतर्गत लेखापरीक्षण करण्याचा हक्क मिळवून देणे ही या समितीची उद्दिष्ट्रे आहेत. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite