Peoples Media Pune header

Go Back

कोलंबसच्या ताफ्यामध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली इलेक्ट्रिक मोबाईल क्लिनिक

18 Jul 2018

कोलंबसच्या ताफ्यामध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली इलेक्ट्रिक(इंधन विरहीत) मोबाईल क्लिनिक/फिरता दवाखाना अॅटो रेनॉन इंडियाकडून विकसित करण्यात आली आहे.हि गाडी संपूर्ण इकोफ्रेंडली /ग्रीन मोबाईल क्लिनिक असून तिचे संपूर्ण तंत्रज्ञान पुण्यात विकसित करण्यात आले आहे.गाडीची क्षमता तीन टन असून तसी ६० कि.मी.या वेगाने  धावू शकणार आहे.साधारण एकदा संपूर्ण बॅटरी चार्ज केल्यावर ताशी १०० कि.मी.प्रवास करता येणार आहे.आवश्यक असल्यास कंपनीकडून एक्स्ट्रा बॅटरीज बसविण्याची सुविधा देण्यात आली आहे.इलेक्ट्रिक (इंधनविरहीत) मोबाईल क्लिनिकसाठी आवश्यक असणा-या सर्व सुविधा अंतर्गत करण्यात आल्या आहेत.असे अॅटो रेनॉनचे संचालक सुदर्शन डोईफोडे यांनी सांगितले.

    वाहन विकसित करताना लागणा-या वैद्यकीय सुविधांसाठी कोलंबस हेल्थ केअरचे संचालक अजय कुलकर्णी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.कोलंबसच्या सी.एस.आर.विभागामार्फत जवळपास ६० गावांमध्ये फिरता दवाखाना चालविला जातो.तसेच फिरते वैद्यकीय तपासणी केंद्र कार्यरत आहे.कोलंबस हेल्थ केअर नेहमीच सामाजिक जाणीव ठेवून नवनवे उपक्रम करीत असतात.म्हणूनच आज कोलंबस कुटुंबात संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली क्लिनिक सामावून घेण्यात अत्यंत आनंद होत आहे असे मत कोलंबसचे अजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.भविष्यात अशा गाड्यांची संख्या वाढविण्याचा मानस असल्याचे सांगितले.   

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite