Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब कर्वेरोडच्या अध्यक्षपदी शिरीष पुराणिक

10 Jul 2018

रोटरी क्लब कर्वेरोडच्या अध्यक्षपदी शिरीष पुराणिक यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष विवेक जोशी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सचिवपदी आस्था अमोणकर यांची निवड करण्यात आली त्यांनी जयंत लष्करे यांच्याकडून सूत्रे स्विकारली.अंबर हॉल कर्वेरोड,कोथरूड यथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी प्रांत 3131CHE चे प्रांतपाल रो.डॉ.शैलेश पालेकर,सहाय्यक प्रांतपाल गौरी शिकारपूर,माजी प्रांतपाल कल्याण वर्दे आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी,सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.नवनिर्वाचित अध्यक्ष शिरीष पुराणिक यांनी आगामी काळात वैद्यकीय,पर्यावरण विषयक,महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस,तसेच विविध शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite