Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब कात्रजच्या अध्यक्षपदी अनंत तिकोणे

09 Jul 2018

रोटरी क्लब ऑफ कात्रजच्या अध्यक्षपदी रो.अनंत तिकोणे यांची निवड करण्यात आली.मावळते अध्यक्ष विभाकर रामतीर्थकर यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.सचिवपदी कीर्ती भन्साळी यांची निवड झाली मावळते सचिव समीर प्रभुणे यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्विकारली.पीवायसी हिंदुजिमखाना येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी प्रांत ३१३१ चे प्रांतपाल डॉ.शैलेश पालेकर,सहाय्यक प्रांतपाल सुवर्णा कुतवळ,माजी प्रांतपाल दीपक शिकारपूर,व नितीन जगताप.आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अनंत तिकोणे यांनी आगामी काळात नैसर्गिक शेती,शून्य खर्च शेती,महिलांसाठी वैद्यकीय व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.शैलेश पालेकर यांनी अनेक रुग्ण अवयवदान न मिळाल्याने मृत्यूपावतात हे दुख: दायक असल्याचे सांगितले व आगामी काळात होणा-या अवयवदान मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite