Peoples Media Pune header

Go Back

मोरेश्वर मेंगडे यांच्या मृत्यूस कारणीभूत पोलीस अधिकारी डोणपिसे यांचे निलंबन करा.आ.डॉ.नीलमताई गो-हे यांची मागणी

09 May 2018

जनवाडी पोलीस चौकी येथे मोरेश्वर मेंगडे यांचे आकस्मिक मृत्यू प्रकरणी शिवसेना प्रवक्ता आ.डॉ.नीलमताई गो-हे यांनी संबंधित परिवाराची भेट घेतली.भारती मोरेश्वर(पत्नी),गौरी विटकर(बहीण),त्यांची विचारपूस केली,तसेच जबाबदार पोलीस अधिका-यांवर कडक कारवाई बाबत अधिवेशनात आवाज उठवणारच परंतु अमित मेंगडे यांची तक्रार घेवून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या.तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीव गृहमंत्री यांना निवेदन करून त्यात संबंधित पोलीस अधिकारी यांचे निलंबनाच्याची मागणी केली.त्या आधी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आ.नीलमताईंची भेट घेवून अनेक घटनांची माहिती दिली.त्याप्रसंगी पुढील कार्यकर्ते उपस्थित होते.बाळासाहेब चव्हाण,मनोहर जांबवंत,राजन नायर,विनोद गोयल,विकास डाबी,विशाल कुसाळकर,मयुरी शिंदे,अल्ताप मिरजादे,सचिन इंगळे,तम्मा विटकर,युवराज शिंगाडे,अमजद खान,बाबा सय्यद,उपस्थित होते.यानंतर संपूर्ण पोलीसस्टेशनचे कर्मचारी पीआय ढोमे,पीएसआय वाघमारे,एपीआय केंजळे,क्राईम पीआय वैशाली गलांडे,हे अमित मेंगडे यांच्या घरी आले.व अमितच्या तक्रारीवरून संबंधितपोलीस अधिकारी डोणपिसे यांची बदली करण्यात आली असली तरी कडक कारवाई करण्याची शिफारस करण्याचे आश्वासन दिले.त्यावर कोणालाही वाचवण्याच्या फंदात न पडता नित पुरावे जमा करा अशा शब्दात गो-हे यांनी भूमिका मांडली  . 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite