Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनेच्या वतीने आयोजित नोकरी महोत्सवात शहर व ग्रामीण भागातील उमेदवारांचा प्रतिसाद

06 May 2018

माजी आमदार व शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खडकवासला मतदारसंघच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.याचे संयोजन भरत आबा कुंभारकर(शहर समन्वयक),मनिष जगदाळे (विभाग समन्वयक),यांनी केले.कार्यक्रमाचे उद्घाटन रमेश कोंडे जिल्हाप्रमुख यांनी केले.सिंह्गड रस्ता ब्रम्हा हॉटेल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमात शहर व परिसरातील ग्रामीण भागातील सुमारे १५० उमेदवारांनी भाग घेतला.यात नॉन मॅट्रीक(नववी)ते पदवीधर,व पदव्युत्तर उमेदवारांचा समावेश होता या प्रसंगी अनिकेत देशमुख,संतोष सावंत,नितीन वाघ,जयसिंग दांगट,वैभव हणमघर,प्रीतम उपलप,शिवाभाऊ पासलकर,आकाश दरवटकर,अमोल जरांडे,किरण मायंगडे,आनंद घरत,संग्राम गायकवाड,राजू पायगुडे,पराग ठकार,प्रथमेश भुकण आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना रमेशबापू कोंडे यांनी मा.हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी दिखाऊ कामा एवजी समाजोपयोगी कामाने आनंद साजरा करावा असे नेहमी सांगितले होते.त्यामुळे परिसरातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी सहाय्य व्हावे म्हणून हा उपक्रम उपयुक्त ठरेल असे सांगितले.

छायाचित्र:मुलाखत देणारे उमेदवार,कंपनी प्रतिनिधी व मान्यवर यांचे समूहचित्र  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite