Peoples Media Pune header

Go Back

सदानंद शेट्टी व सुजाताताई शेट्टी यांची इंदिराजी व पंडीत नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पून आदरांजली

19 Nov 2017

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान व कणखर स्वभावाने आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणा-या स्व.श्रीमती इंदिरा गांधी तसेच पहिले पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्या प्रतिमेस माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी व नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांनी पुष्पहार अर्पून आदरांजली दिली.पंडीत नेहरू जयंती १४ नोव्हेंबर ते इंदिरा गांधी जयंती १९ नोव्हेंबर या कालवधीत त्यांनी १ लाख नगरीक भेट व त्यांच्या समस्या लिखित स्वरुपात स्वीकारल्या.या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सदानंद नगर येथे आज या उपक्रमाची सांगता झाली.या तक्रारीचे विषय व विभागा प्रमाणे वर्गीकरण करून त्यात्या अधिकारी व विभागाकडे या समस्या पाठवून त्यांचा पाठपुरावा करण्यात येईल असे सदानंद शेट्टी यांनी या प्रसंगी सांगितले.सुजाताताई शेट्टी यांनी इंदिराजींचा जन्मदिवस लोकोपयोगी कामाने व्हावा हा या कार्यक्रमाचा हेतू होता असे सांगितले या प्रसंगी धर्मेंद्र खेत्रे,पांडुरंग शिंदे,मंगेश साखरे,प्रशांत कांबळे,मुमताज शेख,महम्मद शेख,सुनिता शेट्टी,भाग्यश्री शेख आदी मान्यवरांच्या बरोबर नागरिक उपस्थित होते.

छायाचित्र ;स्व.इंदिरा गांधी व पंडीत नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना सदानंद शेट्टी 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite