Peoples Media Pune header

Go Back

कु.ऋचा आत्रे हिचा आरंगेत्रम २६ नोव्हेंबर रोजी

17 Nov 2017

बीए.एल.एल.बी च्या तृतीय वर्षात असणा-या कु.ऋचा आत्रेहिचा आरंगेत्रम(भरत नाट्यम प्रथम सादरीकरण)कार्यक्रम रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी एमईएस ऑडीटोरियम,मयूर कॉलनी कोथरूड येथे सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे.सुप्रसिद्ध नृत्यगुरु अर्चना चव्हाण व केतकी काळे यांच्याकडून तिने भरतनाट्यम नृत्य प्रशिक्षण घेतले आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द नृत्यांगना अनुराधा शिंदे,व मीरा धनु आहेत.प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी असतील.या कर्यक्रम प्रसंगी ऋचा  पुष्पांजली,जातीस्वरम,रसिकप्रिया,तोडी,पदम, तिल्हाना,ई प्रकार सादर करणार आहे.या प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी तिचे वडील अॅड.जयंत आत्रे,आई अॅड.वैशाली आत्रे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असून रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अॅड.वैशाली आत्रे यांनी केले आहे.

छायाचित्र :कु.ऋचा हिची एक भावमुद्रा 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite