Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब टिळकरोडच्यावतीने मोफत मधुमेह तपासणी शिबीर संपन्न

14 Nov 2017

भारतात मधुमेहचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.त्यावर उपाययोजना व प्रतिबंध यासाठी १३ नोव्हेंबर पासून सात दिवस मधुमेह सप्ताहपाळला जातो या कालावधीत विविध जनजागृती व अन्य उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.या अनुशंगाने रोटरी क्लब टिळकरोडच्या वतीने १३ व १४ नोव्हेंबर रोजी डॉ.शहाडे हॉस्पिटल व डॉ.बिनीवाले क्लिनिक प्रभातरोड येथे मोफत मधुमेह तपासणीशिबिराचे आयोजन करण्यात आले.या दोन दिवसात सुमारे ३०० नागरिकांनी यात रक्तशर्करा तपासणी करून घेतली.या प्रसंगी सहप्रांतपाल स्नेहल भट,रोटरी क्लब टिळकरोडचे अध्यक्ष चंद्रकांत डांगे,ललितागौरी डांगे,महेंद्र शहा.डॉ.अतुल बिनीवाले,डॉ.आरती शहाडे,दादा साळवे,मुकुंदराव चितळे, श्री सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी मधुमेह व त्याविषयी घेण्याची काळजी या विषयी माहिती देण्यात आली.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite