Peoples Media Pune header

Go Back

महाराष्ट्र सौर उत्पादक असोसिएशनच्या वतीने पहिले सोलर प्रदर्शन

15 Sep 2017

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने प्रथमच प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.म्हात्रे पुलाजवळील सिद्धी बँक्वेट येथील य प्रदर्शनाचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते झाले या प्रसंगी ,मुकुंद कमलाकर(अध्यक्ष),संजय कुलकर्णी(प्रस्तावित अध्यक्ष),प्रदीप कुलकर्णी(उपाध्यक्ष),संजय देशमुख,नरेंद्र पवार,रत्नाकर नळगीरकर आदी मान्यवरांच्या बरोबरच सोलर उत्पादक,सेवादार,व ग्राहक मोठ्या संखेने उपस्थित होते.प्रदर्शनात सुमारे ४० उत्पादक व सेवा पुरवठादार यांनी सहभाग घेतला.यावेळी बोलताना मुक्ताताई टिळक यांनी सोलर उत्पादने ही काळाची गरज असून अशा प्रदर्शनामुळे या क्षेत्रास चालना मिळेल असे सांगितले.अध्यक्ष मुकुंद कमलाकर यांनी बोलताना या क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक प्रयत्न करण्याची आवश्यक्त आहे.अपेक्षित प्रसार व प्रत्यक्ष काम यात तफावत आहे.असे सांगितले.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite