Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या अध्यक्षपदी सत्यजित निगडे.

01 Aug 2022

रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या अध्यक्षपदी सत्यजित निगडे यांची निवड करण्यात आली. त्यांनी मावळत्या अध्यक्ष तृप्ती नानल यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. सेक्रेटरीपदी गोपाल निर्मल यांची निवड करण्यात आली. पुण्याई सभागृह कोथरूड येथे नुकत्याचा संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी नियोजित प्रांतपाल मंजु फडके,सहाय्यक प्रांतपाल नितिन मुळे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी,सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यजित निगडे यांनी आगामी काळात स्वागत बिटीया- गरीब मुली जन्म स्वागत किट वाटप,पाळीव प्राण्यांसाठी प्रकल्प,घरगुती हिंसाचार आळा,निर्माल्य पासून खत निर्मिती  प्रकल्प आदी समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

छायाचित्र :सत्यजित निगडे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite