Peoples Media Pune header

Go Back

मराठी तरुणाने लिहिलेले इंग्रजी पुस्तक “लव्ह द कि टू ऑपटिमिझम”या पुस्तकास १३२ देशांतून प्रतिसाद

14 Sep 2016

श्री.रोशन.दि.भोंडेकर या तरूण मराठी माणसाने लिहीलेल्या लव्ह द कि टू ऑपटिमिझमया पुस्तकास जगभरातील सुमारे १३२ देशात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.या पुस्तकात प्रेमाचे मूल्य व यशश्वी जीवनासाठी उपयोग कसा करावा याचे विश्लेषण आहे.जीवनात येणा-या कठीण प्रसंगावर कशी मात करावी हे या पुस्तकातील ४२ धडयांतून सांगितले आहे.युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेले हे पुस्तक ऑनलाईन विक्रीसाठी अमेझोन,फ्लिपकार्ट,गुगल या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.तसेच हे पुस्तक भारतातील प्रमुख पुस्तकालयांत देखील उपलब्ध आहे.या पुस्तकातून मिळणा-या रॉयल्टी पैकी ५०%रक्कम ही देशातील अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.पुस्तक ३७४ पानी असून किमत ३९९ रुपये आहे.

लेखक रोशन भोंडेकर हे संगणक अभियंता तसेच व्यक्तिमत्व विकासावर व्याख्याने देतात. अधिक माहितीकरिता www.roshanbhondekar.wordpress.comया संकेतस्थळाला भेट द्यावी. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite