Peoples Media Pune header

Go Back

पोस्ट कोविड केअर सेंटरचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन.

17 Sep 2021

भारताचे पंतप्रधानमा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्तरोटरी क्लब कर्वेनगर,जनमित्र सेवा संघ,हेल्थ पॉइंट केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भेलकेनगर चौक कोथरूड येथे पोस्ट कोविड केअर सेंटरचे पुण्याचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेशजी करपे,रोटरी प्रांत ३१३१ एजी ऋजुता देसाई,हेल्थ पॉइंट पॉलिक्लिनिकचे डायरेक्टर शिरीष पुराणिक,रोटरी क्लब कर्वेनगरच्या अध्यक्ष रो.गौरी कुलकर्णी,डायबेटॉलॉजीक डॉ.वृषाली नाईक,कर्करोग तज्ञ डॉ.मिलिंद कुलकर्णी,होमिओपॅथी  डॉ.स्वाती लढढा,मानस शास्त्रतज्ञ डॉ.देवयानी कट्टी,डॉ.दिलीप कुलकर्णी ,रोटरी क्लब कर्वेनगर सदस्य रो. नितिन कुलकर्णी,रो.राजन पाटील,रो.आकांक्षा पुराणिक आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना मुरलीधर मोहोळ म्हणाले. “कोविड होवून गेल्यानंतरही काही समस्या निर्माण होतात जसे म्युकरमायकोसिस,मानसिक तणाव,रक्तात अडथळे व अन्य यासाठी विविध पॅथीचे तज्ञ एकत्र येवून सेवा देणारे हे केंद्र महत्वाचे आहे असे प्रतिपादन केले.  

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite