Peoples Media Pune header

Go Back

“देवतरूच्या आजी आजोबांकडून गणेशोत्सव दिमाखात साजरा”.

17 Sep 2021

वृद्धाश्रमात राहणारे ज्येष्ठ नागरिकांसाठी तेच घर व तेथील अन्य सदस्य नातेवाईक असतात. कोरोना-लॉकडाउन अशा अनंत अडचणीतून ही मार्ग काढत मरगळ झटकून देवतरू फाउंडेशनच्या “देवतरू”वृद्धाश्रमात सत्तरीच्या पुढील ५०-६० आजी आजोबांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय,दररोज नित्य नियमाने सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून संस्कृतिक कार्यक्रम,नाचगाणे,एकपात्री प्रयोग करून प्रत्येकाने आपल्या कलागुणांनुसार सादरीकरण केले. नित्य नियमाने आरती,आवडीचा प्रसाद,आणि मनोरंजन  करीत गणपती बाप्पाकडे कोरोनाचे संकट टळो असे साकडे घातले. या उपक्रमात देवतरूच्या प्रमुख सौ.दीपिकाताई खिंवसरा जातीने लक्ष घालतात. व सर्व कर्मचारी व मदतनीस या सर्व आजी आजोबांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात असे नमूद केले. 

छायाचित्र :जुन्या वाड्याच्या देखाव्यासमोरनृत्य करताना काही ज्येष्ठ नागरिक. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite